बॉलीवुडमधील “देशी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रान नुकतीच मुंबईला एका रॅम्प वॉकसाठी आली होती. प्रियांका ब-याच दिवसानंतर रॅम्प वॉक करताना दिसली. सध्या प्रियांका आपला पती निक जोन्ससोबत लॉस एंजेलिस येथे राहते. ती काम आणि असाइनमेंटच्या संदर्भात अमेरिका आणि भारतात येत-जात राहते. मुंबईत एका “फॅशन शो’दरम्यान ब्लॅक गाऊनमध्ये रॅम्प चालवून प्रियांका चोप्राने सर्वांची मने जिंकली.
प्रियांका चोप्राने हाय राइज बन आणि न्यूड मेकअपसह ऑफ शोल्डर ब्लॅक कट शिमरी गाऊन घातला होता. ब्लॅन्डर्स प्राइड फॅशन वीक फॅशन टूर अंतर्गत “द प्राइड ऑफ इंडिया शो’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांकाचे विशेष स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रियांका चोप्रा ही 14 फॅशन डिझायनर्ससह स्टेजवर दिसली.
दरम्यान, प्रियांकाने रॅम्प वॉक करण्यापूर्वी आपल्या चाहत्यांना एक ट्रीट दिली आणि स्वतः मेकअप करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांनी अनेक कॉमेटस् देत तिचे अभिनंदन केले आहे.