मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने आज ग्लोबल स्टार म्हणून आपला ठसा उमटवला आहे. या तिने 2000 मध्ये मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला होता, त्यानंतर प्रियांकाने मागे वळून पाहिले नाही, फक्त यशाच्या पायऱ्या चढल्या.
सध्या जगभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या प्रियांकाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो प्रियांकाच्या मिस वर्ल्डच्या दिवसांचा आहे.
बिकिनी फोटोशूटचे फोटो व्हायरल
प्रियांका चोप्राचे 2000 साली मिस वर्ल्ड बनतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्टाईलच्या बाबतीत नेहमीच ऑन पॉइंट असलेली प्रियांका या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे,
या छायाचित्रांमध्ये बेवॉच देशी गर्लने बिकिनीला भारतीय टचही दिला आहे. मिसेस जोनासने कपाळावर बिंदी आणि हातात बांगड्या या फोटोशूटसाठी कॅरी केल्या आहे. प्रियांकाने ब्रॉन्झ मेकअपसह आपले केस मोकळे ठेवले आहेत.
View this post on Instagram
या फोटोशूटमध्ये प्रियांकाने अतिशय किलर पोज दिल्या आहेत. प्रियांका समुद्राजवळ तपकिरी रंगाच्या बिकिनीमध्ये झाडाच्या कडेला पोझ देताना सुंदर दिसत आहे. प्रियांका 2000 मध्ये मिस वर्ल्ड बनली तेव्हा ती 21 वर्षांची होती. आजच्या तारखेत प्रियांका एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. पॉप सिंगर निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली आहे.