प्रियांकाला पाण्यात पडण्यापासुन निकने वाचवले

बॉलिवूड- हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या पॅरिसमध्ये पती निक जोनाससोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. यावेळी प्रियांका ही निकसोबत याच (बोट) राईडवर गेली होती. या दरम्यान त्यांच्यासोबत त्यांचे मित्र-मैत्रिणही राईडवर होते. सर्वचजण नाच-गाण्यात बीझी होते आणि त्याचवेळेस प्रियांकाचा पाय घसरला. प्रियांकाचा पाय घसरल्याने ती खाली पाण्यात पडणार होती तितक्‍यात पती निक जोनास याने तिला सावरले.

निक जोनास याने प्रियंकाला वेळेवर सावरले नसते तर ती पाण्यात कोसळली असती. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. प्रियांका आणि निक हे निकचा भाऊ जो जोनास आणि सोफी टर्नर यांच्या लग्नासाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी सीक्रेड वेडिंग केले होते. त्यानंतर आता दोघेही फ्रेंच वेडिंग करत आहेत. यापूर्वी प्रियांका आणि निक हे दोघेही जो जोनास आणि सोफी टर्नर यांच्यासोबत डिनरला गेले होते. त्यावेळचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.