उपस्थितांसह कॉंग्रेसच्या नेत्यांनाही हसू अनावर
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या एका सभेमध्ये कॉंग्रेसच्याच नेत्यांनी अभिनेत्री प्रियंका चोप्रा जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनिया गांधी जिंदाबाद कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद प्रियंका चोप्रा जिंदाबाद अशा घोषणा कॉंग्रेसचे नेते सुरेंद्र कुमार यांनी या घोषणा दिल्या. कुमार यांनी चूकून प्रियंका गांधींच्या नावाऐवजी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नावाने घोषा दिल्या आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांनाही हसू अनावर झाले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
#WATCH Delhi: Slogan of “Sonia Gandhi zindabad! Congress party zindabad! Rahul Gandhi zindabad! Priyanka Chopra zindabad!” (instead of Priyanka Gandhi Vadra) mistakenly raised by Congress’ Surender Kr at a public rally. Delhi Congress chief Subhash Chopra was also present.(01.12) pic.twitter.com/ddFDuZDTwH
— ANI (@ANI) December 1, 2019
दिल्लीमध्ये कॉंग्रेसने एका सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी दिल्ली कॉंग्रेसचे नेते सुभाष चोप्राही उपस्थित होते. या सभेमध्ये कॉंग्रेसचे नेता सुरेंद्र कुमार यांनी उपस्थित समर्थकांना उत्साह निर्माण करण्यासाठी मंचावरुन घोषणा देण्यास सुरुवात केली. सोनिया गांधी जिंदाबाद कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद च्या घोषणा जनतेने दिल्या. त्यानंतर शेवटी मात्र कुमार यांनी चक्क प्रियंका गांधींऐवजी प्रियंका चोप्राच्या नावाने घोषणा दिली. विशेष म्हणजे या घोषणेवरही समर्थकांनी जिंदाबादचा आवाज दिला. जिंदाबादचा आवाज आल्यानंतर कुमार यांना आपली चूक लक्षात आली तोपर्यंत उशीर झाला होता. समोर घडलेला प्रकार पाहून सुभाष चोप्राही इकडे तिकडे बघू लागले.
हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर इतका व्हायरल झाला की प्रियंका चोप्रा ट्विटवर टॉप ट्रेण्डींग टॉपिक होती. नशीब राहुल गांधी या सभेला नाही आले नाहीतर येथे राहुल बजाज जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या असत्या, असा टोला एका युझरने या घटनेवर ट्विट करताना लगावला आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने प्रियंका चोप्रा कॉंग्रेसमध्ये कधी गेली? असा सवाल उपस्थित केला.