प्रियंका चोप्रा जरी हॉलीवूडमध्ये गेली असली तरी तिचे चाहते भारतातच आहेत. प्रियंका चोप्राने आपल्या करियरमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. तिच्या भूमिकांमध्ये वैविध्य असते.
आता तिला अहिल्याबाई होळकर यांच्या रोलची ऑफर देण्यात आली आहे. लेखक मनोज मुंताशिर या नव्या सिनेमोची निर्मिती करणार आहे. राणी अहिल्याबाईच्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असलेली आग, पॅशन आणि आत्मविश्वास प्रियंकामध्ये असल्याचे मनोज मुंटाशीर यांनी सांगितले आहे.
या रोलसाठी अद्याप प्रियंकाशी चर्चा झालेली नाही. करोनाच्या साथीमुळे प्रियांका गेल्या कित्येक महिन्यांपासून परदेशातच अडकलेली आहे. ती भारतात परत आल्यानंतर तिच्याशी यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2021 च्या अखेरीस राणी अहिल्याबाई होळकरांवरील चित्रपट फ्लोअरवर येऊ शकेल. सध्या मनोज मुंताशिर आपल्या टीमबरोबर मिळून या सिनेमाच्या कथेवर आणि डायलॉगवर काम करत आहेत.
बाहुबली सिरीजनंतर दक्षिणात्य इंडस्ट्रीतील निर्मात्यांनीही मनोज मुंताशिरला विचारण्यास सुरुवात केली आहे. जर सगळे समिकरण जुळून आले तर प्रियांका चोप्राला आपण राणी अहिल्याबाई होळकरांच्या बायोपिकमध्ये बघू शकू.