गेल्या काही दिवसांपासून अभिनेते कबीर बेदी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमुळे खूप चर्चेत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी “स्टोरीज आय मस्ट टेल : इमोशनल लाइफ ऑफ ऍन ऍक्टर’ नावाचे पुस्तक लिहिले होते. आता हे पुस्तक इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्राच्या हस्ते प्रकाशित केले जाणार आहे.
कबीर बेदी आणि प्रियंका चोप्रा दोघेही बॉलीवूडच्या बाहेर हॉलीवूडमध्ये ही खूप सक्रिय आहेत. प्रियंका चोप्राने देखील “अनफिनिश्ड’ नावाची आपली ऑटोबायोग्राफी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली आहे. कबीर बेदीची ऑटोबायोग्रफी प्रकाशित करणे व्हर्च्युअल होणार आहे.
प्रियंका आणि कबीर लंडन मधून या कार्यक्रमात सहभागी होतील. तर एका एंटरटेनमेंट पोर्टलवरून त्याचे टेलिकास्ट केले जाणार आहे. कबीर बेदीने आपल्या ऑटोबायोग्राफीतून आपली अफेअर, रिलेशनशिप आणि केलेल्या लग्नांबाबत खूप धक्कादायक खुलासे केले आहेत.