हॉलीवूडमधील देशी गर्ल अर्थात ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनस सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. पण छोटा ब्रेक घेत त्यांनी क्वालिटी टाइम स्पेंड केला आहे. यावेळी प्रियांका चोप्रा गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळताना दिसत आहे.
तिच्यासोबत निक आणि त्यांचे काही मित्रही उपस्थित होते. निक आणि प्रियांका एकत्र वेळ घालवत आहेत. यासोबत एक व्हिडिओदेखील आहे.
ज्यात जोनस ब्रदर्स परफॉर्म करत आहेत. मागील वीकेंडही प्रियांकासाठी खास ठरला होता. बिकीनीत ती स्वतःला टॅन करताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीचे प्रियांकाने तिच्या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती जखमी झाली होती. सीटाडेलसाठी शुटींग करत असताना तिला दुखापत झाली होती.
प्रियांका तिच्या अनेक प्रोजेक्टमध्ये सध्या बिझी आहे. याशिवाय ती बॉलीवूड चित्रपट “जी ले जरा’मध्ये आलिया भट्ट आणि कतरिनासोबत दिसणार आहे.