मुबई – अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या पतीसोबत विदेशात राहते. त्यामुळे आपल्या देशातील अनेक गोष्टींना ती मिस करते.म्हणूनच बोनी कपूर आणि खुशी कपूर यांनी प्रियांकाला घरच्या जेवणाची आठवण करून दिली आहे. बोनी कपूर आणि खुशी यांनी प्रियांकाला घरच्या जेवणाची मेजवानी दिली. ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करून त्याचे आभार मानले आहेत. प्रियांकाने जेवणाचा एक फोटो शेअर केला आहे.
प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर जेवणाचा एक फोटो शेअर केला आहे, जो तिला बोनी कपूर आणि खुशी कपूर यांनी पाठवला आहे. प्रियांकाने पोहे, खाखरा आणि नमकीनच्या विविध प्रकारांचा फोटो शेअर केला आहे. हे सर्व खाद्यपदार्थ टेबलावर ठेवले आहेत. फोटो शेअर करत प्रियांकाने घरच्या चवीबद्दल बोनी कपूर आणि खुशी कपूरचे आभार देखील मानले आहेत.
प्रियांकाचे न्यूयॉर्कमध्ये स्वतःचे भारतीय रेस्टॉरंट आहे. त्याच्या रेस्टॉरंटचे नाव सोना आहे. प्रियंका अनेकदा तिच्या रेस्टॉरंटचे फोटो शेअर करत असते. प्रियांकाकडे सध्या अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट आहेत. यासोबतच ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत फरहान अख्तरच्या बॉलीवूड चित्रपट जी ले जरा मध्ये दिसणार आहे. ती अखेरची ‘द स्काय इज पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती.