प्रियांका चोप्राने सुरू केले भारतासाठी निधी संकलन

करोनाच्या आपत्तीमुळे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीज आपापल्या परीने मदतकार्यात सहभागी होत आहेत. सध्या लंडनमध्ये असलेल्या प्रियांका चोप्राने भारतातील करोनाच्या स्थितीविरोधात लढण्यासाठी जगभरातील भारतीयांमधून निधी संकलन करायला सुरुवात केली आहे.

प्रियांकाने गुरुवारी एक व्हिडिओ रिलीज करून सर्व भारतीयांना भारतातील या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपापल्या परीने आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले आहे. तिने “गिव्ह इडिया’ नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मदेखील तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मवर ती स्वतः आणि तिचा नवरा निक जोनास यांनी आपले आर्थिक योगदान जमा केले आहे.

तसेच इतरांनीही करावे, असे प्रियांकाने म्हटले आहे. या निधीचा उपयोग भारतात ऑक्‍सिजन, बेड, औषधे आणि कोविड लसी उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे. आपण सर्वच जण आपापल्या देशासाठी काम करायल पाहिजे. भारत माझा देश आहे, म्हणून मी भारतासाठी निधी संकलन करते आहे. तसेच सर्व भारतीयांनी करावे, असे प्रियांकाने
म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.