प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये सुरू केले हॉटेल

न्यूयॉर्क – प्रियंका चोप्राने विदेशात राहणाऱ्या भारतीयांना एक छानसे गिफ्ट दिले आहे. तिने न्यूयॉर्क शहरात एक आलिशान हॉटेल सुरू केले आहे. तिने या हॉटेलचे नाव “सोना’ असे ठेवले आहे. अर्थात त्या हॉटेलमध्ये भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल असणार हे उघड आहे. यातूनच तिला भारतीय खाद्यपदार्थांबद्दलचे प्रेम व्यक्‍त करायची संधीही मिळाली आहे. प्रियंकाची आत्मकथा असलेल्या “अनफिनिश्‍ड’चे प्रकाशन अलिकडेच झाले.

या पुस्तकात प्रियंकाने स्वतःबद्दलची सर्व हकिगत मांडली आहे. त्यातच तिने आगामी काळात हॉटेल सुरू करण्याचा मनोदयही व्यक्‍त केला होता. त्यानुसार तिने न्यूयॉर्कमध्ये हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेलच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने तिने एक पूजाही ठेवली होती. तिच्याबरोबर तिचा नवरा निक जोनासही या पूजेमध्ये सहभागी झाला होता.

पारंपारिक भारतीय वेशभूषेमध्ये हे दाम्पत्य हातात पूजेचे तबक घेऊन उभे असल्याचे फोटो प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो 2019 मधील आहेत, हे प्रियंकाने स्पष्ट केले आहे. हॉटेलसाठी जागा घेतल्यावर सर्वप्रथम एक पूजा केली होती. त्यावेळचे हे फोटो असल्याचे तिने म्हटले आहे. थोडक्‍यात तिच्या हॉटेलची तयारी दोन वर्षांपूर्वीपासून सुरू होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.