प्रियांका चोप्रा गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतच आहे. सध्या ती “सिटाडेल’ नावाच्या वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय तिने अलीकडे प्रॉपर्टी डिलिंगमध्येही लक्ष घालायला सुरुवात केली आहे. तिने मुंबईतील आपल्या दोन आलिशान प्रॉपर्टी विकून टाकल्या आहेत. हा व्यवहार कोट्यवधी रुपयांचा झाला आहे.
View this post on Instagram
राज क्लासिक, वर्सोवा, अंधेरीतील प्रॉपर्टी एकूण 7 कोटी रुपयांना विकली. तेराव्या मजल्यावरील एक फ्लॅट 3 कोटी रुपयांना विकला गेल्याचे समजले आहे. याशिवाय आणखीन एक फ्लॅट तिने 4 कोटी रुपयांना विकून टाकला आहे.
View this post on Instagram
याशिवाय तिने मुंबईतील आपले ऑफिस मोठ्या कंपनीला भाड्याने देऊन टाकले आहे. प्रियांका चोप्रा सध्या “टेक्स्ट फॉर यू’ आणि “मॅट्रिक्स 4’या हॉलीवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. या सगळ्या प्रोजेक्टमधून तिला हॉलीवूड सिनेवर्ल्डमध्ये ओळख निर्माण करायची आहे. एवढे चांगले करिअर होत असताना मुंबईत गुंतवणूक अडवून ठेवण्यात काहीही अर्थ नाही हे प्रियांकाच्या लक्षात आले आहे.