मुंबई – आता अमेरिकेत स्थायिक झालेली आणि निक जॉनसह विविध हॉलिवूड मालिका, सिनेमांत दिसणारी प्रियंका चोप्रा सध्या ट्वीटरवर खूपच ऍक्टीव्ह आहे. आज 18 डिसेंबर रोजी पाच वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळींचा बाजीराव-मस्तानी हा बिगबजेट चित्रपट रिलीज झाला होता. त्याच्या आठवणींचा एक व्हिडिओ प्रियंकाने आपल्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केला आहे. या चित्रपटातील बाजीरावाच्या प्रथम पत्नीचा, काशीबाईचा रोल प्रियंकाने केला होता. तिच्या या भूमिकेला रसिकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला होता. प्रियंकाने रणवीरसिंग अर्थात बाजीराव पेशव्यांसमवेतची काही दृष्ये शेअर केली आहेत.
With extremely fond memories of a glorious experience playing the gentle strength of Kashi we celebrate the #5YearsOfBajiraoMastani.
Congratulations Sanjay sir @RanveerOfficial @deepikapadukone @tanviazmi and everyone on the team! pic.twitter.com/ZDViwNyMtQ— PRIYANKA (@priyankachopra) December 18, 2020
मात्र, या संपूर्ण व्हिडीओमध्ये मस्तानी अर्थात दीपिका पदुकोणच्या भूमिकेचा कुठेही उल्लेख नसल्याने प्रियंकाच्या चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “तू काय किंवा रणबीर काय, आता तुम्ही दोघेही विवाहित आहात आणि सिनेमा प्रदर्शित होऊनही पाच वर्षे झाली आहेत. मग दीपिकाला का वगळले, असे काही जणांनी विचारले आहे.