Priyanka Chopra । अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने ऑस्ट्रेलियात तिच्या आगामी ॲक्शन चित्रपट ‘द ब्लफ’चे शूटिंग पूर्ण केले होते, ज्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडियावर काही जबरदस्त फोटोसह शेअर केली होती. ती काही काळ फॅमिली टाइम एन्जॉय करणार आहे.
प्रियांकाच्या ‘द ब्लफ’ चित्रपटाचे शूटिंग आता ऑस्ट्रेलियात संपले आहे. यानंतर ती, निक आणि मालती लॉस एंजेलिसमधील त्यांच्या घरी परतले आहेत. या तिघांचे थक्क करणारे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रियांका, निक आणि मालतीचे एअरपोर्टवरील कॅन्डिड फोटो, जे पापाराझींनी क्लिक केले होते, ते खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाने राखाडी रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग ट्रॅक पॅन्ट कॅरी केली आहे. तर निक ट्रॅक सूटमध्ये दिसत आहे.
लेक मालती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. विमानतळावर प्रियांका आणि निक दोघेही लेक मालतीला सांभाळताना दिसत आहे. प्रियांकानेही कॅन्डिड फोटोमध्ये मालतीसोबत मस्ती केली. आता या तिघांचे हे अप्रतिम फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावर चाहते त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, ‘सिटाडेल 2’ मध्ये दिसणार आहे. ज्याची माहिती देत प्रियांकाने या मालिकेतील तिचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला. याशिवाय प्रियांका ‘द ब्लफ’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियंकाशिवाय कार्ल अर्बन, इस्माईल क्रुझ कॉर्डोव्हा, सफिया ओकले-ग्रीन आणि वेदांतन नायडू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.