बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी वेबसीरिज Citadelचे शूटिंग करत आहे. यादरम्यान, अभिनेत्री तिचे इंस्टाग्राम फोटो शेअर करून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने सेटवरील एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर पुन्हा एक फोटो शेअर केला आहे, मात्र हा फोटो पाहून तुम्ही काही सेकंदांसाठी घाबरून जाल, पण पुढच्याच क्षणी तुम्हालाही फोटोचे सत्य कळेल.
View this post on Instagram
प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये प्रियांका खूपच थकलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर जखमा आणि रक्ताचे डाग आहेत. अभिनेत्रीचा हा फोटो पाहिल्यावर प्रथमदर्शनी तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसत असले तरी बारकाईने पाहिल्यानंतर अभिनेत्रीने चेहऱ्यावर मेकअप केल्याचे दिसून येईल. या फोटोला प्रियंकाने कॅप्शन दिले ‘Did u have a tough day at work as well?’