देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा फक्त चित्रपटसृष्टी आणि फॅशन शोमध्येच नव्हे, तर समाजकार्य करण्यातही सतत सक्रिय असते. ती गेल्या 15 वर्षांपासून यूनिसेफची ऍबेंसडर म्हणून जोडली गेलेली आहे. आता युनिसेफने प्रियांकाचा “डॅनी केय मानवतावादी पुरस्कारा’ने गौरव केला आहे.
न्यूयॉर्क येथील स्नोफ्लेक बॉल येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळयात प्रियांकाला या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना प्रियांका म्हणाली, आज समाज सेवा हा एक विकल्प नसून तो आता माझया जीवनातील एक भाग बनला आहे. तसेच याप्रसंगी तिने यूनिसेफसोबत गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रवासाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रियांकाला मिळालेल्या या पुरस्काराबाबत तिचा पती निक जोन्स यानेही आनंद आणि गर्व असल्याचे सांगितले. त्याने प्रियांकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, तु ज्या प्रकारची व्यक्ती आहात आणि युनिसेफशी संबंधित असलेल्या 15 वर्षे सद्भावना दूत म्हणून तु जगात केलेल्या चांगल्या कार्याबद्दल मला अभिमान आहे. तू माझी प्रेरणा आहेस. अभिनंदन!