अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधून हॊलीवूडमध्ये गेल्यानंतर प्रियांकाची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली आहे. त्यामुळे तिच्या सोशल मीडियावरील किरकोळ पोस्टलादेखील हजारो फॅन्स शेअर करतात. सध्या प्रियांका अशाच एका व्यावसायिक पोस्टच्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
प्रियांकाने नुकताच सोना होम नावाचा नवीन ऑनलाईन भारतीय होमवेअरचा व्यवसाय सुरु केला आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भांडी ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला दुप्पट नाही किंवा तिप्पटही नाही तर तब्बल पन्नास पट अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणूनच प्रियांकाच्या या भांडे विकणाऱ्या साईटची जोरदार चर्चा आहे.
सोना होम ब्रॅण्डच्या अधिकृत वेब साइटनुसार कपबशीची किंमत सुमारे ५ हजार रुपये तर एका प्लेटची किंमत ४ हजार रुपये आहे. त्यासोबतच एका सर्व्हिंग बाऊलची किंमत तब्बल ७ हजार रुपये तर एका टेबल क्लोथची किंमत ३० हजार रुपये आहे. भारसाठ किमती असणाऱ्या या भांड्याच्या साईटमुळे प्रियांका सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होतीए.
Launch day is here! I couldn’t be more proud to introduce you all to SONA HOME. It was challenging to come from India and make America my second home, but my journey led me to a place where I found a second family and friends. I bring a piece of India into everything I do. pic.twitter.com/6Xz4FCffVc
— PRIYANKA (@priyankachopra) June 22, 2022
प्रियंकाने याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. साध्या भांड्याची किंमत हजारोंच्या घरात असल्यामुळे नेटकाऱ्यानी प्रियंकाला चांगलेच धारेवर धरले आहे. युजर्सने तर प्रियांकाच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.