Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्रा, पती निक जोनास आणि लेक मालतीसह न्यूयॉर्क ट्रीपचा आनंद घेत आहे. प्रियांकाने या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात मालतीची धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्क ट्रीपमधील फोटोंमध्ये मालतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
निक जोनास आणि प्रियांकाने १ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले. लग्नाचा वाढदिवसानिमित्त दोघेही लेकीसह न्यूयॉर्क ट्रिपवर गेले आहेत. याच ट्रिपमधील फोटो आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. प्रियांकाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये मालतीच्या हाताच्या बोटांना खोटी नखं लावली आहे.
तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने स्वत: मालतीचे दोन्ही हात एकमेकांना जोडून सर्व नखे दाखवली आहेत. या फोटोंना तिने कॅप्शन देत ‘एक सुखद छोटासा जादूचा क्षण’ असे लिहिले आहे. Priyanka Chopra |
View this post on Instagram
निक जोनासनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रियांका आणि लेकीबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याने पत्नी आणि लेकीबरोबर ‘मोआना २’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावलेली दिसते. हे फोटो पोस्ट करत “आमच्या लग्नाचा सहावा वाढदिवस, ‘मोआना २’, कुटुंबाबरोबर खास क्षण, न्यूयॉर्क शहर या पेक्षा सुंदर काय असू शकतं, माझं मन भरून आले आहे”, असे कॅप्शन निकने दिले आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Priyanka Chopra |
हेही वाचा:
फडणवीस म्हणाले,”जनतेची दिशाभूल करू नका”; उत्तर देत शरद पवार म्हणाले,”मी काय चुकीचं केलं?”