बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच आई झाली असून अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. तेव्हापासून अभिनेत्रीच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, प्रियंकाच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण अभिनेत्रीने तिच्या मुलीचा प्रथमच फोटो शेअर केला आहे.
मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी चाहत्यांसाठी मुलीची फक्त एक झलक पुरेशी आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही तिच्यासोबत दिसत आहे. प्रियांका तिच्या मुलीला मिठी मारत आहे आणि निक तिच्याकडे प्रेमाने पाहत असल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने लिहिले की, मदर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की, आम्हाला माहित आहे की अधिक लोकांनी याचा अनुभव घेतला असेल. NICU मध्ये 100 हून अधिक दिवसांनंतर, आमची लहान मुलगी शेवटी घरी आली आहे. प्रत्येक कुटुंबाचा प्रवास अनोखा असतो आणि त्यासाठी एका विश्वासाची आवश्यकता असते आमच्याही आयुष्यातील शेवटचे काही महिने आव्हानात्मक होते.
प्रियांकाने लिहिले की, जर आपण मागे वळून पाहिले तर आपल्याला प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे याची जाणीव होते. आम्हाला खूप आनंद झाला आहे की आमची लहान मुलगी शेवटी घरी आली आहे. यावेळी अभिनेत्रीने डॉक्टरांचे आभारही मानले आहेत.