न्यूयॉर्क – अमेरिकेतील टेक्सास मधील रॉब प्राथमिक शाळेत एका तरुणाने अंधाधुंद गोळीबार केल्या या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसंह 3 शिक्षकांचा मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडीयावर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये एक न्यूज आर्टिकलचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. या आर्टिकला अभिनेत्रीने एक कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये ती म्हणाली ‘केवळ श्रद्धांजली वाहणे पुरेसे नाही. त्यापेक्षा जास्त काही तरी केलं पाहिजे. या घटनेबाबत ऐकून खूप दु:ख झालं ‘ अशी पोस्ट टेक्सास गोळीबार प्रकरणानंतर प्रियंकाने शेअर केली आहे.