प्रियांका चोप्रा-जोनास अभिनेत्री, गायिका आणि प्रोड्यूसर देखील आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण कधी करणार, असा प्रश्न विचारल्यावर प्रियांकाने आपल्याला डायरेक्शनची भीती वाटते, असे सांगितले.
माजी “मिस वर्ल्ड’ प्रियंका चोप्राने ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ स्पाई’ पासून वर्ष 2003 मध्ये बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते.
त्यानंतर ‘एतराज’, ‘फॅशन’, “7 खून माफ’, ‘बर्फी’ आणि ‘मेरी कॉम’ सारख्या आपल्या दमदार चित्रपटांवरील चित्रपटांमधून आपला ठसा उमटवला आहे. दुसरीकडे तिने “व्हेंटिलेटर’, “पहुना : द लिटील व्हिजीटर’ आणि “हालिया’सारख्या सिनेमांचे प्रॉडक्शनही केलेले आहे. तिच्या प्रॉडक्शनच्या “द स्काय इज पिंक’चे ती सध्या जोरदार प्रमोशन करते आहे.
आता डायरेक्शनचे म्हणाल तर एक गोष्ट म्हणजे, मला त्याची खूप भीती वाटते, ज्या प्रमाणे मी हळू हळू अभिनय करता करता निर्माती बनले. त्याचप्रमाणे हळू हळू दिग्दर्शिकाही बनू शकेल. तो दिवस एकदा तरी नक्की उजाडेल. आता ते कधी हे काही सांगता येणार नाही, असे प्रियांका म्हणाली.
सध्यातरी प्रियंका ‘द स्काय इज पिंक’ रिलीज होण्याची वाट बघ्ते आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर फरहान अख्तर, जायरा वसिम आणि रोहित सराफही आहेत.