बॉलीवूडमध्ये एक यशस्वी ऍक्ट्रेस बनल्यानंतर प्रियांका चोप्रा आता हॉलीवूडमध्येही चांगलीच स्थिरावली आहे. गेल्या दशकभरापासून ती ग्लोबल आयकॉन बनली आहे. हल्ली ती लंडनमध्ये आपली आगामी वेबसिरीज “सिटाडेल’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
त्याबरोबरच ती आपल्या अन्य इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या रिलीजचीही वाट बघते आहे. हॉलीवूडमध्ये ऍक्टिव्ह राहूनही ती बॉलीवूडकडे दुर्लक्ष होऊ देत नाही आहे. मात्र, हॉलीवूड आणि बॉलीवूड यापैकी एकाची निवड करायची तर कशाची निवड करशील, असा प्रश्न तिला विचारला तेव्हा ती या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही.
तिने या प्रश्नाचे उत्तर देणेच टाळले. इन्स्टाग्रामवर प्रियांकाने अलीकडेच “इटस ट्रिकी’ चॅलेंज स्वीकारले होते. या चॅलेंजमधील अनेक प्रश्नांना प्रियांकाने अगदी सहज उत्तरे दिली. मात्र, बॉलीवूड आणि हॉलीवूड यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली,
तेव्हा मात्र ती चांगलीच गडबडली. या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तिने हा प्रश्न सोडून देण्याची तयारी दाखवली. “सिटाडेल’च्या सेटवर तिच्या चेहऱ्यावर एका जखमेची खूण दिसते आहे. ही खरी जखम नसून केवळ मेकअप असल्याचे तिने सांगितले.