बोल्ड फोटो पोस्ट केल्याने प्रियांका झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतली शाळा…

सध्या भारतात करोना रुग्ण आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर  बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे प्रियांकाला ट्रोल केलं जात आहे. “भारत मरत आहे आणि तू फोटो पोस्ट करत आहेस’ असं म्हणत नेटकऱ्यांनी प्रियांकाला धारेवर धरले आहे.


मागे प्रियांकाने एक व्हिडिओ पोस्ट करत भारतातील करोना स्थितीबाबत चिंता व्यक्‍त केली होती. मात्र, आता बोल्ड फोटो पोस्ट केले आहे. त्यामुळे प्रियांकाला भारतातील करोना स्थितीबाबत खरोखरच काहीतरी घेणंदेणं आहे का, असा प्रश्‍न पडतो.

प्रियंकाने नुकतेच बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.  याच सोहळ्यातील तिचे फोटो शूट सध्या सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.   या सोहळ्यातही यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. म्हणूनच की काय तिने हटके स्टाईल केली असावी असाही प्रश्न सोशल मीडिया युजर्सला पडतो आहे.

या ड्रेसच्या किंमतीवरही सोशलवर चर्चा रंगत आहे.   ड्रेसची किंमत तब्बल 925,186 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या आकर्षक ड्रेसमुळे प्रियंकाचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते.  मात्र तिला पुन्हा एकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.