मोदी विरूद्ध प्रियांका? अद्याप निर्णय नाही

कॉंग्रेस नेते राजीव शुक्‍ला यांची माहिती
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी वढेरा यांना पक्षातर्फे निवडणूक लढवण्यास सांगितले गेले असल्याचे वृत्त आहे. तथापि या संबंधात अद्याप कसलाच निर्णय घेण्यात आलेला नाही असे कॉंग्रेस नेते राजीव शुक्‍ला यांनी सांगितले. ते म्हणाले की त्यांच्याकडे सध्या केवळ पुर्व उत्तरप्रदेशचे प्रभारीपद सोपवण्यात आले असून त्या तेथे उत्तम प्रचार करीत असल्याने त्याचा कॉंग्रेसला लाभ होत आहे असे ते म्हणाले. पंधरा दिवसांपुर्वी रायबरेली येथे बोलताना स्वता प्रियांका यांनी आपण मोदींच्या विरोधात वाराणसी येथे लढण्यासही घाबरत नाही असे म्हटले होते त्यावरून मोदी विरूद्ध प्रियांका असा सामना वाराणसीत रंगणार असल्याचे सांगितले जात होते.

प्रियांका यांनी रायबरेलीतून उभे राहावे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता त्यावेळी मी वाराणसीतून मोदींच्या विरोधात लढलेले तुम्हाला चालणार नाही का असा नर्म विनोदी शैलतील सवाल प्रियांका यांनी केला होता. तेव्हापासून या चर्चेला प्रारंभ झाला होता.राजीव शुक्‍ला यांनी यावेळी कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यामुळे पक्षाला निवडणुकीत चांगले वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की न्याय योजना आणि कृषीखात्यासाठी स्वतंत्र अर्थ संकल्प ही या जाहीरनाम्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.