“द फॅमिली मॅन’ मध्या मनोज वाजपेयीच्या पत्नीचा रोल करणाऱ्या प्रिया मणिच्या कामाचे खूप कौतुक होते आहे. मात्र या बद्दल आनंद वाटण्याऐवजी तिला वेगळ्याच गोष्टीचे दुःख होते आहे.
प्रिया मणि दिसायला खूप सुंदर जरी असली तरी ती सावळी असल्यामुळा तिला “ब्लॅक आंटी’म्हणून सारखे चिडवले जायचे. तिने कॉलेजच्या दिवसापासूनच मॉडेलिंग सुरू केले होते.
त्यावेळीदेखील तिला या बॉडी शेमिंगचा अनुभव आला नव्हता. प्रिया मणिने तमिळ सिनेमातून कामाला सुरूवात केली होती. तर त्यानंतर तिने कन्नड, तेलगू, मल्याळममध्येही काम केले आहे.
मात्र हिंदीमध्ये काम करायला लागल्यापासून तिला बॉडी शेमिंगचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. मेकअपशिवाय ती जेंव्हा आपला फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते तेंव्हा लोक तिले “आंटी’ म्हणून ट्रोल करत असायचे.
तिने कामाला सुरूवात केली होती तेंव्हा तिला “मोटी’ म्हणून चिडवले जायचे. यासगळ्याकडे प्रिया मणिने वेळोलेळी दुर्लक्षच केले आहे.
कारण आपण कसेह असला तरी लोक बोलणारच आहेत हे तिला व्यवस्थित समजून चुकले आहे. आता अजय देवगणबरोबर ती “मैदान’मध्येही दिसणार आहे.