प्रियदर्शन जाधवला करोनाची लागण; रुग्णालयात दाखल

मुंबई – राज्यात करोनाने भयंकर रूप धारण केले आहे. रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या ५० हजारांच्या जवळपास पोहचली. बॉलिवूडसह मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारही करोनाच्या विळख्यात अडकत आहे. यामध्ये आता अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रियदर्शनने माहिती दिली.

प्रियदर्शन जाधव म्हंटले कि,  मी सर्वांना कळवू इच्छितो की सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सर्व नियम पाळत आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी ही विनंती , काळजी घ्या, अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली आहे.


दरम्यान, बॉलिवूडलाही करोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. राम सेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. आता अक्षय पाठोपाठ ‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवरील तब्बल ४५ जणांना करोनची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.