हंगेरीतील जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकला सुवर्णपदक

बुडापेस्ट – टोक्‍यो ऑलिम्पिक्‍समध्ये एकीकडे मीराबाई चानूने काल रौप्य पदकाची कमाई केलेली असताना जागतिक कुस्ती स्पर्धेतही भारताचे नाव चांगलेच झळकले आहे.

कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे.

प्रिया मलिकने मिळवलेल्या गोल्ड मेडलमुळे आनंद व्यक्त होत आहे. प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 75 किलो वजनी गटात बेलारुसच्या कुस्तीपटूला 5-0 ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

प्रिया मलिकने याआधी 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, 2019 मध्ये दिल्लीतील 17 व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2020 मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चॅंपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.