प्रिया बापटचा ‘तो’ व्हिडिओ सोशलवर व्हायरल

पुणे – सध्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांना करोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांना करोनाची लागण झाली होती. यावर त्यांनी यशस्वी मात केली आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने ‘‘go corona go‘ असे कॅप्शन देत एक गाणंदेखील म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ती “आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. तसेच तिने या व्हिडिओखाली ‘go corona go, #fightback Ago असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

या पोस्टद्वारे प्रिया सर्वांना करोना परिस्थिती सोबत लढण्याचे बळ सर्वांना मिळूदे ही प्रार्थना करत आहे. आणि करोनाला पळवून लावण्यासाठी आपल्याला धैर्य मिळू दे, असेसुद्धा म्हणत आहे. प्रिया बापटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

या व्हिडिओवर असंख्य चाहत्यांनी कमेंट्‌स केल्या असून, अनेकांनी तो रि-पोस्ट केला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत प्रिया बापटच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.