मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘प्रिया बापट’ने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे. प्रिया सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रीय असते.
दरम्यान, नुकतंच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, या फोटोतून प्रियाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. सध्या प्रियाचा हा मराठमोळा लूक तिच्या चात्यांना घायाळ करत आहे.
प्रिया या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. तिचा हा फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडले. प्रियाचा हा लूक तिच्या फॅन्सनादेखील आवडला आहे. तसंच प्रियाने या फोटो खाली “पलट” असं कॅप्शन सुद्धा दिल आहे.