मुंबई- अभिनेत्री प्रिया बापट नेहमी वेगवेगळे लुक ट्राय करत असते. त्यातील अनेक लुकमध्ये ती सुंदर दिसते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग करडा असल्याने तिने सिंपल करड्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे.
ती आणि तिची बहिण मिळून एक नवाकोरा साडी ब्रँड सुरु केला आहे. त्या दोघी नेहमी नवं काहीतरी करत असतात. गेले काही दिवस ती अनेक कारीगरांच्या संपर्कात आहे आणि त्यातून झालेल्या चर्चेतून श्वेताने पुन्हा एकदा या Brand वर काम करणं सुरू केलं, असं तिने सांगितलं आहे.
Hi तुम्हा सर्वांना माझं साडी प्रेम परिचीत आहे. मला खरंच वाटतं की saree is one of the most graceful attire. या Covid -19 च्या काळात सगळ्याच व्यवसायांना मोठा फटका बसलाय. तसंच तो कापडउद्योगालाही बसला.
माझी बहिण श्वेता गेली १० वर्ष Fashion आणि Textile क्षेत्रात काम करत्ये. तिची Sawenchi @sawenchi ही स्वत:ची Brand आहे. गेले काही दिवस ती अनेक कारीगरांच्या संपर्कात आहे आणि त्यातून झालेल्या चर्चेतून श्वेताने पुन्हा एकदा या Brand वर काम करणं सुरू केलं. आणि यात मी सुध्दा तिच्याबरोबर “बाराबरकी Partner” झाले आहे. So… here we are. Sawenchi तर्फे आम्ही घेऊन येत आहोत handloom साड्यांचं collection. चंदेरी, महेश्वरी, काॅटन सिल्क, अजरक print मोडाल सिल्क अशा अनेऽऽऽऽऽक प्रकारच्या साड्या. आमच्या Insta page ला जरूर like करा, shopping करा आणि तुमचे photo share करा, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
लॉकडाऊनमध्ये प्रियाने फिटनेसकडे जास्त लक्ष दिले होते. जीम बंद असले तरीही तिने स्वत:च्या घराच्या पायऱ्या टुल म्हणून वापरले. सतत धडपडणारी मात्र तेवढीच लाघवी अशी तिची ओळख आहे. तिने आतापर्यंत अनेकदा अनेक विषयांवर आपली चोख मतं सुद्धा मांडली आहे.