खासगी कर्मचाऱ्यांनादेखील मतदानादिवशी सुट्टी द्या

राज्याच्या कामगार आयुक्‍तांचे आदेश

मुंबई : खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सोमवारी,21 ऑक्‍टोबर रोजी भरपगारी सुटी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.

राज्य शासनाने याविषयी 25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे मतदानादिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलतीस पात्र असतील. मतदारसंघातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना सुटीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्‍यक राहील. अशी सवलत मिळत नसल्यास तसेच मतदानासाठी सुटी दिल्यानंतर त्या दिवशीचे वेतन कपात केल्यास जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)