मेढा – करोना प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग २४ तास झटत असताना मेढा येथील सर्वच खासगी डॉक्टरांनी पळ काढला आहे. संकट काळात पळ काढणाऱ्या व देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांविरुध्द जावळी तालुक्यातून संताप व्यक्त होताना दिसत आहे..
नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये दवाखाने मेडिकल वगळले असेले तरीदेखील जावळी तालुक्यातील खासगी दवाखान्यातील सर्वच डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे मेढा येथील नागरिकांनी संताप व्यक्त करून यापुढे खासगी दवाखाना न बघता केवळ सरकारीच दवाखान्यामध्ये जाण्याची भावना व्यक्त करून दाखवली .
संपूर्ण जगावर आलेल्या करोना संकटात डॉक्टरच केवळ देव आहेत, अशी भावना एकीकडे असतानाच मेढा येथे ‘ देव’ पळपुटे आहेत, असे चित्र पाहयला मिळत आहे. मेढा शहरात जवळपास १५ ते २० खासगी दवाखाने असून सगळेच दवाखाने बंद आहेत. गर्भवती स्त्रिया , ज्येष्ठ नागरिक व इतर रुग्णांना केवळ सरकारी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. काही डॉक्टरांनी काही जणांचे उपचार अर्ध्यावरच सोडून पळ काढला आहे. यांमुळे करोना नव्हे इतर आजारांनीही त्रस्त होण्याची वेळ जावळीकरांवर येऊन ठेपली आहे.
साहेब फालतू चे काहीपण छापू नका, सत्यता पडताळणी करा आधी.