खासगी बसचालकांच्या आर्थिक लुटला चाप

अतिरिक्‍त भाडे आकारणाऱ्या 69 बसेसवर दंडात्मक कारवाई

 

पुणे – दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असते. याचाच फायदा घेत खासगी वाहतुकदारांकडून जादा भाडे आकारत प्रवाशांची आर्थिक लुट केली जाते.

अशा अतिरिक्‍त भाडे आकारणाऱ्या, धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांविरोधात परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यापैकी जादा भाडे आकारल्याबाबत 69 बसेसवर कारवाई केली.

दिवाळीच्या सुट्ट्यांत नागरिक पर्यटनासाठी किंवा बाहेरगावी राहणारे विद्यार्थी, नोकरदार आपल्या मूळगावी जातात. त्यामुळे खासगी बसच्या प्रवाशांचे प्रमाणदेखील वाढते. प्रवासी संख्येत वाढ झाल्याचा फायदा घेत खासगी बस वाहतुकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडेदर आकारण्यात येते.

याच पार्श्‍वभूमीवर परिवहन आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी अवाजवी भाडे आकारणाऱ्या वाहतुकदारांवर कारवाईचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले होते. त्यानुसार राज्यात 13 नोव्हेंबरपासून ही कारवाई करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.