#Video : पुणे-सोलापूर मार्गावर खासगी बसला आग

पुणे : पुणे सोलापूर मार्गावर आज पहाटे एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून बस जळून खाक झाली आहे.


पुणे सोलापूर मार्गावरील हिंदुस्थान चर्च समोर खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. खासगी बस क्र. MH12 NX 8198 शुक्रवारी पहाटे 6.00 वाजता आग लागली. दरम्यान, आग लागल्याचे समजातच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाचे तांडेल असिफ शेख, फायरमन अनिल ताजने ,अभिजित घुमटकर, प्रमोद चव्हाण, महेश जगताप, निखिल जगताप आणि चालक इम्रान तांबोळी यांनी ही आग आटोक्‍यात आणली. नेमकी ही आग कोणत्या कारणाने लागली याविषयीची माहिती मिळू शकली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.