पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा अप्रतिम बेली डान्स

जान्हवी कपूरच्या गाण्यावर केला बेली डान्स

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर आणि क्रिकेटमधलं भारताचं उद्याचं भविष्य असलेल्या पृथ्वी शॉने आयपीएलच्या 14 व्या पर्वात आपल्या बॅटची जादू दाखवली. सात सामन्यात त्याने शानदार तीन अर्धशतकं झळकावली. पृथ्वी आपल्या शानदार बॅटिंगने तर नेहमी चर्चेत असतो पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोक चर्चा करत असतात. पृथ्वी टीव्ही स्टार प्राची सिंगला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

प्राचीही अनेकवेळा पृथ्वीचं कौतुक करते. आयपीएलमधील पृथ्वीच्या दमदार कामगिरीनंतर तीन ते चार वेळा तिने इन्स्टा पोस्ट लिहून पृथ्वीच्या पाठीवर प्रेमाची आणि कौतुकाची थाप मारली. आता तिच्या एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालतोय. तिने जान्हवी कपूरच्या गाण्यावर बेली डान्स केलाय.

 

 

प्राची सिंगने इन्स्टाग्रामवर एका डान्सचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत ती बेली डान्स करताना दिसून येत आहे. जान्हवी कपूरच्या ‘रुही’ चित्रपटातील ‘नदियों पार सजन डा थाना’ या गाण्यावर प्राचीने सुंदर डान्स केलाय. तिचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी तिच्या या डान्सचं कौतुक केलंय.

प्राचीचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबई येथे झाला होता. प्राची ही छोट्या पडद्यावरची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2019 मध्ये उडान सीरियलमधील वंशिका शर्माच्या भूमिकेत ती प्रथम कलर्स टीव्हीवर दिसली होती. तेव्हापासून तिच्या कामाला गती मिळाली.

 

 

अभिनयाबरोबरच प्राचीला डान्सची आवड आहे. ती उत्तम बेली डान्स करते. प्राचीच्या इन्स्टाग्राममध्ये तिचे डान्स व्हिडीओ पाहायला मिळतील. इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. 19.8 हजारांहुन अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.