मुंबई : हताश झाल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेक व्हिडीओ शेअर करत आहेत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. फडणवीसांनी ट्विटरवरुन शेअर केलेल्या व्हिडीओवरुन चव्हाणांनी त्यांना धारेवर धरले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, फडणवीस हताश होऊन बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटते. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडीओची सत्यता तपासली पाहिजे.
माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी द्वेषपूर्ण आणि संभाव्य खोटी माहिती पसरवण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. दरम्यान, सुधारित नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदूंच्या विरोधात घोषणा दिल्याचा दावा केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस या व्हिडीओसह दोन व्हिडीओ काल ट्विटरवरुन शेअर केले होते.