अक्षय कुमार साकारणार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका

अखेरचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांची कहाणी मोठ्या पडद्यावर दाखवण्याची तयारी सुरू झाली आहे. या सिनेमात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमातची शूटिंग नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार आहे. या सिनेमाचे प्री प्रॉडक्‍शनचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. सिनेमाचे पहिले शेड्यूेल मुंबईत पूर्ण होईल. त्यानंतर राजस्थानमध्ये याचे शूटिंग होईल. हा सिनेमा तराईन युद्धावर आधारित असणार आहे.

पृथ्वीराज चौहान याची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमारच्या नावाला संमती मिळाली आहे. तर, सिनेमात दुसरा महत्वाचा रोल आणि मुख्य व्हिलन मोहम्मद गौरीच्या भूमिकेसाठी संजय दत्तशी बातचीत केली जात आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये त्यांची पत्नी संयोगिता, गयासुद्दीन गजनी, जयचंद यांची पात्रे महत्त्वपूर्ण असतील. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय कुमार व्यतिरिक्त इतर पात्रे कोण साकारणार याबाबत अद्याप नावे निश्‍चित करण्यात आलेली नाहीत.

पृथ्वीराज चौहान यांचे शत्रू जयचंद यांची मुलगी संयुक्तासोबत त्यांची प्रेम कहाणी प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज चौहान तिच्या स्वयंवराच्या दिवशीच तिला घेऊन गेले होते. ज्या तराईन युद्धावर हा चित्रपट आधारीत आहे त्या युद्धात पृथ्वीराज चव्हान यांनी मोहम्मद गौरीचा पराभव केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.