#AUSvIND : पृथ्वी शॉ वर खापर फोडू नका – आकाश चोप्रा

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉला संघात स्थान मिळणार नाही असे संकेत मिळत आहेत. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका होत आहे. मात्र, पृथ्वीच्या डोक्‍यावर खापर फोडू नका, असे सांगत माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने टीकाकारांना संयमाने वक्‍तव्य करा, अशा शब्दांत कान टोचले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावणाऱ्या भारतीय संघासमोर बॉक्‍सिंग डे कसोटीसाठी संघनिवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉची सुमार कामगिरी, कर्णधार विराट कोहलीचे मायदेशी परतणे, महंमद शमीला झालेली दुखापत या सगळ्यामुळे आधीच भारतीय संघ बेजार झाला आहे. त्यात आता पृथ्वीबाबत सुरू असलेली टीका याचीही भर पडली आहे. त्याला इतक्‍या मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्याची गरज नाही. तो एकटा या पराभवाला जबाबदार नाही, त्यामुळे विनाकारण त्याच्यावर खापर फोडू नये, असेही चोप्रा याने म्हटले आहे.

पृथ्वीला संघात स्थान मिळणार नाही, हे जवळपास निश्‍चित आहे. त्याची कामगिरी दोन्ही डावांत खराब झाली आहे यात काही वादच नाही. पृथ्वीला वगळून शुभमन गिलला मिळण्याची शक्‍यता आहे. तिसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा पुनरागमन करेल, मग कोणाला संघाबाहेर बसवाल. गिल आणि पृथ्वी यांच्यात जो कमी धावा करेल त्याला बाहेर बसवावे लागेल. पृथ्वीला बळीचा बकरा बनवू नका, असेही त्याने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.