कोकणाच्या पार्श्वभूमीवर खुलणार ‘प्रीतम’ची प्रेमकथा

निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ सुपारी, आंब्याची झाडं, सुंदर-शांत असा आसमंत आणि संस्कृती परंपरेचा विलक्षण ठेवा असणाऱ्या या मनोहारी लोकेशनची भुरळ निर्मात्यांना व दिग्दर्शकांना पडली नसती तर नवल! आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी आहे आणि त्या जोडीला एक हळवी प्रेमकथा या निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे.

कोकणसारखाच निसर्गाचा वरदहस्त केरळला सुद्धा लाभला आहे. कोकण आणि केरळचा एक अनोखा संगम या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. केरळ मधील प्रसिद्ध “विझार्ड प्रोडक्शन” या चित्रसंस्थेच्या माध्यमातून ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून मल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.

चिपळूण, कणकवली, कुडाळ या नयनरम्य परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून प्रणव रावराणे आणि नक्षत्र मेढेकर ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, आनंदा कारेकर, अस्मिता खटखटे, आबा वेलणकर, समीर खांडेकर, नयन जाधव, विश्वजित पालव, अजित देवळे, कृतिका या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती फैझल निथीन, सिजो करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)