कैद्यांना मिळणार माफी (भाग-२)

गुन्हेगारांसाठी सुधारगृहे बनण्याऐवजी आपल्याकडील तुरुंग यातना आणि गुन्ह्यांची केंद्र बनू लागले आहेत. समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची असल्यास कायदेशीर प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याबरोबरच तुरुंगांची परिस्थिती सुधारणे आणि कैद्यांशी संवेदनशील व्यवहार करणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त वयस्कर तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त कैद्यांना माफी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, आता तुरुंगांची दुरवस्था दूर करण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.

कैद्यांना मिळणार माफी (भाग-१)

देशातील बहुतांश तुरुंगांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. एनसीआरबीच्या नोंदींनुसार, तुरुंगांमध्ये क्षमतेच्या सरासरी 114 टक्के कैदी आहेत. अनेक राज्यांत तर काही तुरुंगांमध्ये क्षमतेच्या 400 टक्के कैदी कोंबलेले आहेत. ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. काही वयस्कर कैदी तुरुंगातून सुटल्यावर काय करणार, असा विचार करून त्यांची सुटका होत नाही तर गंभीर गुन्हे करणारे अनेक तरुण कैदी असे आहेत, ज्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरसुद्धा समाजाला ते घातक ठरतील म्हणून त्यांची सुटका केली जात नाही. असा तर्क लावून एखाद्या कैद्याला मुदतीपेक्षा अधिक काळ तुरुंगात ठेवणे हे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी चांगली धोरणे तयार करायला हवीत. कारण तेही या समाजाचाच हिस्सा आहेत. वयस्कर कैद्यांची सुटका झाल्यानंतर समाजात ते शांततेत राहू शकतील, याची तजवीज करणे आवश्‍यक आहे. तरुण कैद्यांनी सुटका झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये यासाठीही त्यांचे पुनर्वसन आवश्‍यक आहे. महिला कैद्यांना तर भीषण अनुभव येतात. सुटकेनंतर अनेक महिला कैद्यांना घरात घेतले जात नाही. अनेक गुन्ह्यांमध्ये तर महिलांना दुसऱ्याच कुणीतरी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागल्याची उदाहरणे आहेत. तसेच गुन्हेगार नसताना शिक्षा झालेले अनेक पुरुष कैदीही दिसतात. त्यामुळे ज्याला शिक्षा झाली तो अपराधी आहे, असे मानून त्याच्याशी व्यवहार करणे अतार्किक ठरते. याउलट समाजात अशी अनेक माणसे असतात, ज्यांना गंभीर गुन्हे करूनसुद्धा शिक्षा होत नाही. समाज अशा अपराध्यांना स्वीकारतो परंतु तुरुंगात जाऊन आलेल्या निर्दोषांना स्वीकारत नाही, है दुर्दैव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– अॅॅड. प्रदीप उमाप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)