चंदिगढ – माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांनी पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 4 वाजता रोड रेज प्रकरणात आत्मसमर्पण केले. तीन दशक जुन्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली. एका घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी सिद्धू यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी पटियाला कारागृहात करण्यात आली आहे. आणखी एक व्हीआयपी व्यक्ती आणि सिद्धूचे कट्टर प्रतिस्पर्धी अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मजिठिया हे देखील याच तुरुंगात बंद आहेत. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या मजिठियाने फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्व मतदारसंघातून सिद्धूविरुद्ध निवडणूक लढवली होती. मात्र, दोघेही निवडणुकीत पराभूत झाले आणि आम आदमी पक्षाच्या जीवनज्योत कौर यांनी दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव केला. पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद नुकतेच सोडलेले सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सिद्धूंचा तुरुंगातला दिवस असा जाईल…
इतर कैद्यांप्रमाणे त्यांचाही दिवस पहाटे 5.30 वाजता सुरू होईल, सकाळी 7 वाजता: त्यांना चहासोबत बिस्किटे आणि काळे चणे दिले जातील. सकाळी 8:30: नाश्ता, सहा चपात्या, भाजी दिली जाईल त्यानंतर त्यांच्या कामाची वेळ सुरू होईल. सायंकाळी 5:30 वाजता सर्व कैदी त्यांचे नेमलेले काम पूर्ण करतील. संध्याकाळी 6 वाजता रात्रीच्या जेवणात त्यांना पुन्हा सहा चपात्या, भाज्या इ. दिले जाईल. संध्याकाळी 7 वाजता कैद्यांसह त्यांना बॅरेकमध्ये बंद केले जाईल.
कारागृहातील कामानुसार कैद्यांना 30 ते 90 रुपये रोज मिळतात. मात्र पहिल्या तीन महिन्यांत कोणताही मोबदला न घेता दोषींना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना अकुशल, अर्धकुशल आणि प्रशिक्षित कैदी म्हणून चिन्हांकित केले जाते. दोषी आढळलेले आरोपी दिवसाला आठ तास काम करू शकतात. त्यानंतर त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येते. यानंतर त्यांना पोलिसांच्या जीपमधून कारागृहात नेण्यात येते. उच्च दर्जाचे ड्रेस परिधान करणाऱ्या सिद्धूंना कारागृहात फक्त पांढरे कपडेच घालावे लागणार आहेत.
खरं तर, 27 डिसेंबर 1988 रोजी सिद्धूचा पटियाला येथील गुरनाम सिंग नावाच्या व्यक्तीसोबत पार्किंगवरून वाद झाला होता. सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर सिंग संधू यांनी गुरनाम सिंग यांना त्यांच्या कारमधून बाहेर ओढले आणि त्यांच्यावर हल्ला केला. नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सिद्धूने पीडिताच्या डोक्यावर मारल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. 1999 मध्ये स्थानिक न्यायालयाने पुराव्याअभावी सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती, परंतु 2006 मध्ये, उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरुद्ध सिद्धू यांनी अपील केले, ज्यामुळे शिक्षेची मुदत कमी झाली आणि दंडही ठोठावला. सिद्धू यांनी कोणतेही शस्त्र वापरले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.