ओझर : जुन्नर तालुक्यात दळणवळण व पाण्याचा प्रश्न प्रलंबित असुन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनी धोलवड येथे दिले. जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनी धोलवड येथील मतदारांशी संपर्क साधला.
या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते अनंतराव चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले, पुणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख खंडागळे, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, अनिल तांबे, श्री विघ्नहर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, धोलवडचे सरपंच वैभव नलावडे, निवृत्ती मुढे, सुभाष मुंढे, शिवसेना शाखा प्रमुख निवृत्ती मुंढे, बबन नलावडे, भारत नलावडे, अशोक मुंढे, संजय कासार, दिलीप मुंढे, कैलास नलावडे, पांडुरंग नलावडे, सुधाकर नलावडे, शंकर मुंढे, बबन नलावडे, कारभारी मुंढे, विक्रम नलावडे, प्रदिप मुंढे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उमेदवार सत्यशिल शेरकर म्हणाले की, महाराष्ट्राचा होणारा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याने शरद पवार, उध्दव ठाकरे,राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी. श्री विघ्नहर कारखान्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत . आघाडी सरकार आल्यावर विकास कांमासाठी निधीची कमी पडणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहान शेरकर यांनी केले.
माऊली खंडागळे म्हणाले की, शरद पवार, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडणा-या गद्दारांना त्यांची दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनाच मतदान करायचे आहे. सर्व शिवसैनिकांनी जागरूक होऊन आपल्या हक्काच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे.कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहान शिवसैनिकांना केले.
सरपंच वैभव नलावडे म्हणाले की, धोलवड गाव हे आदरणीय शरद पवार व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे गाव असुन आजपर्यंत कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. हा परीसर सुजलाम सुफलाम केवळ पवार साहेबांमुळेच झाला आहे. त्यामुळे गावातील सर्व मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनाच मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.