कॉंग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य 

प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदींचा घरचा आहेर

लखनऊ – उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान दिल्यामुळे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यांनी एक संदेश टिव्‌ट करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये प्रियांका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशातील या कॉंग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. पण आता त्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे.

त्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ज्यांनी पक्षासाठी रक्त आटवले, घाम गाळला त्यांच्याऐवजी कॉंग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य दिले जात आहे. मी पक्षासाठी दगड खाल्ले, अपशब्द ऐकले, पण पक्षामध्येच ज्यांनी मला धमकावले. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, हे दुर्देव आहे असे त्यांनी आपल्या टिव्‌टमध्ये म्हटले आहे. त्यांनी एक व्‌टि रिव्‌टि करुन हा संदेश लिहिला आहे.

या पत्रामध्ये जो मजकूर आहे, त्यानुसार प्रियांका चतुर्वेदीच्या तक्रारीवरुन पक्षातील या नेत्यांचे निलंबन करण्यात आले होते. पण आता ज्योतिरादित्य सिंधियांच्या हस्तक्षेपानंतर या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सिंधिया कॉंग्रेसचे सरचिटणीस असून त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राफेल करारासंबंधी प्रियांका चतुर्वेदींची मथुरेमध्ये पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी त्यांच्या बरोबर गैरवर्तनाचा हा प्रकार घडला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.