शिक्षकांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवा : महेंद्र अवघडे

गोंदवले  – माण तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न समजून घेऊन ते प्राधान्याने सोडविण्याची मागणी शिक्षक बॅंकेचे उपाध्यक्ष महिंद्र अवघडे यांनी केली. माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रलंबित प्रश्‍नाबाबत चर्चा केली.

यावेळी शिक्षक संघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सातव्या वेतन आयोगाच्या नोंदी सेवा पुस्तकात कराव्यात, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा शिक्षण विभागामार्फत गौरव करावा, वैद्यकीय बिले, फंडातून नापरतावा अग्रीमचे प्रस्ताव कार्यालयात दाखल होताच पुढील कार्यवाही विनाविलंब व्हावी, आयकर कपात दर महा व्हावी, मध्यान्ह भोजन योजना, स्थायित्व प्रमाणपत्र, संचमान्यतेत अतिरिक्त शिक्षक, गट विमा इत्यादी विषय सोडवावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनी तात्काळ सर्व समस्यांची दखल घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी राजाराम खाडे, पोपट जाधव, मोहन जाधव, उमेश शेंडे, वर्षा देवकर, भारती शिंदे, सुधाकर काटकर, हणमंतराव अवघडे, अरुण जाधव, जावेद मुल्ला, श्रीमंत खाडे, नथुराम जाधव, महादेव जाधव, शशिकांत खाडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)