वडगाव निंबाळकरमध्ये बिंगो मटक्‍यावर छापा

1 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त
बारामती (प्रतिनिधी) – वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे सुरू असलेल्या ऑनलाइन बिंगो मटक्‍यावर छापा टाकत 1 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अप्पर शाखा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र जीवन गायकवाड, शिवाजी जयदीप साळवे, दादा गनीभाई आत्तार व भाऊ माने यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वडगावमधील बस स्थानकाजवळ ऑनलाइन बिंगो मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी या ठिकाणाहून 28 हजारांची रोख रक्कम, 30 हजार रुपयांचे तीन सॅमसंग कंपनीचे टॅब, 1 लाख 35 हजार रुपयांच्या नऊ इलेक्‍ट्रॉनिक मशिन्स असा 1 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, हवालदार संदीप जाधव, विठ्ठल कदम, सुरेंद्र वाघ, स्वप्निल अहिवळे, विशाल जावळे, शर्मा पवार, अमोल भुजबळ यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.