Pune : अॅट्राॅसिटी, विनयभंग प्रकरणात प्राचार्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे – विधवा व मागासवर्गीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणात सासवड पोलिसांनी अटक केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरंदर (सासवड) दिवेच्या प्राचार्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश सहारे यांनी हा आदेश दिला आहे. विनयभंग, ऍट्रासिटीच्या कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आनंद कोंडीबा शिगळे (वय 43, रा. चिंचवड) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. विवेक भरगुडे, ऍड. प्रसाद भरगुडे, ऍड. वैशाली मुळ्ळीकर आणि ऍड. कुमार पायगुडे यांनी काम पाहिले. याबाबत 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी असून, शिगळे तेथे प्राचार्य आहेत. फिर्यादी मागासवर्गीय असतानाही अश्‍लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी अटक करून शिगळे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी संस्था, महाविद्यालयाच्या ठिकाणी सेक्‍शल हॅरॅशमेंट ऑफ वुमन ऍट ऑफीस अशी एक समिती असते. त्या समितीला या घटनेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तिला त्या अधिकाऱ्यांनी कामाचे नियम न पाळणे, कोविडचे नियम पाळत नसल्याने कारणे दाखवा नोटीस महिलेला दिल्या आहेत. त्यामुळे याबाबत खोटी तक्रार देण्यात आली आहे. येथे ऍट्रॉसिटी लागू होत नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे ऍड. विवेक भरगुडे यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.