राजकुमार संतोषी बनवणार “गांधी वर्सेस गोडसे’

राजकुमार संतोषींनी बऱ्याच दिवसात कोणताही नवीन सिनेमा बनवलेला नाही. महात्मा गांधींच्या जीवनावरील एक सिनेमा संतोषींनी बनवायला घेतला असून, या सिनेमाचे बहुतेक काम आता पूर्ण झाले आहे. या सिनेमात गांधीजींच्या अखेरच्या दिवसांमधील काही घडामोडींवर प्रकाश टाकला गेलेला आहे. 1948-48 च्या काळातील भारताचे दर्शन आपल्याला या सिनेमातून घडणार आहे. या सिनेमाचे बहुतेक शूटिंग पूर्ण झाले आहे.

केवळ 1-2 दिवसांचेच शूटिंग बाकी राहिले आहे. सध्या लागू असलेला लॉकडाऊन उठवला गेला की, आठवडाभरातच हे उरलेले शूटिंग समाप्त होईल. या सिनेमाचे शीर्षक “गांधी वर्सेस गोडसे’ असे आहे. असगर वसाहत यांनी लिहिलेल्या “गांधी गोडसे. कॉम’ या नाटकावर हा सिनेमा आधारलेला आहे.

यामध्ये गांधीजी आणि नथुराम गोडसे या परस्पर भिन्न स्वभावाच्या व्यक्‍तिरेखांना एकमेकांसमोर बसवून त्यांची चर्चा घडवून आणली गेली आहे. लोकांनी आपल्या विवेकाने कोणत्या विचारधारेला अनुसरायचे हे ठरवावे, यासाठी असे केले गेले आहे. सिनेमात बॉलीवूडमधील कोणीही गाजलेले कलाकार नसतील, तर नाटकात काम करणाऱ्या कलाकारांनाच सिनेमात घेतले गेले असेल. महात्मा गांधींच्या रोलमध्ये थिएटर ऍक्‍टर दीपक पटणी असतील, तर नथुराम गोडसेच्या भूमिकेत मराठी कलाकार चिन्मय मांडलेकर असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.