युवराज फिलीप यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

लंडन – ब्रिटनचे युवराज फिलीप यांच्यावर अलिकडेच हृद्‌यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली. युवराज यांना पूर्वीपासूनच असलेल्या हृदयरोगासंदर्भात ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाल्याचे बकिंगहॅम पॅलेसच्या सूत्रांनी सांगितले.

महाराणी एलिझाबेथ यांचे पती युवराज फिलीप गेल्या दोन आठवड्यांपासून किंग एडवर्ड रुग्णालयात आहेत. अलिकडेच काही चाचण्यांसाठी त्यांना सेंट बार्थोलोमेव्ह हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येईल, असेही राजप्रासादाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

युवराज फिलीप अर्थात द ड्युक ऑफ एडिनबर्ग यांचा जून महिन्यात 100 वा वाढदिवस आहे. राजघराण्याचे आतापर्यंतचे ते सर्वात जास्त काळ राजेपदावर कायम राहिलेले युवराज आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.