ब्रिटनचे 99 वर्षीय युवराज फिलीप यांची प्रकृती बिघडली

किंग एडवर्ड रूग्णालयात दाखल

लंडन – ब्रिटनचे 99 वर्षीय युवराज फिलिप यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना लंडनच्या रुग्णालयात दाखल केले आहे, असे बकिंगहॅम पॅलेसने सांगितले.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती युवराज फिलीप यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मंगळवारी संध्याकाळी खासगी किंग एडवर्ड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे राजप्रासादाच्या निवेदनात म्हटले आहे. फिलिप यांना डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय आणि काही दिवसांच्या निरीक्षणासाठी तसेच विश्रांतीसाठी इस्पितळातच ठेवले जाणे अपेक्षित आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

युवराज फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग म्हणून ओळखले जाते. ते 2017 मध्ये सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले आणि त्यानंतर ते क्‍वचितच सार्वजनिक समारंभांमध्ये सहभागी झाले आहेत.

इंग्लंडमध्ये सध्या करोनाच्या साथीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान ते लंडनच्या पश्‍चिमेस विंडसर राजवाड्यात राणीसमवेत राहिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.