हॅकर्सने केली बिटकॉईन्सची मागणी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्सनल वेबसाइटचे ट्विटर अकाउंट गुरुवारी हॅकर्सनी हॅक केले आहे. ट्विटरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल वेबसाइटचे ट्विटर हॅंडलवरून एका पाठोपाठ एक असे अनेक ट्वीट केले. तसेच क्रिप्टों करन्सी संबंधित अनेक ट्वीट केले आहेत. हॅकरने नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले ट्विटर अकाऊंट हॅक केले. पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरने चक्क बिटक्वाइन देण्याची मागणी केली. हॅकरनं हे ट्विट नंतर लगेच डिलीट करण्यात आलं.
ट्विटर अकाउंटवर करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये लिहिण्यात आले होते की, ‘मी तुम्हा लोकांकडे अपील करतो की, कोविड-19 साठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडमध्ये डोनेट करा.’ ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सना पंतप्रधान मोदींच्या या वेबसाइट अकाउंटबाबत माहिती होती आणि आता हे सुरक्षित करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे पर्सनल वेबसाइटचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर जुलैमध्ये अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, ऍमेझॉन सीईओ जेफ बेजोस, वॉरेन बफेट, बिल गेट्स, एलॉन मस्क, जो बिडेनसह अनेक लोकांचे अकाउंट्स हॅकर्सनी हॅक केले होते.