पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मथुरेतून ‘प्लास्टिक मुक्‍त भारत’चा नारा

मथुरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरामध्ये पशुवैद्यकिय विश्‍वविद्यालयात पशु आरोग्य मेळाव्याची सुरूवात केली. तसेच यावेळी मोदींनी देशभरातील 40 मोबाईल पशू वैद्यकिय वाहनांना हिरवा झेंडा दाखवला आणि वेगवेगळ्या आजारांविषयी लसीकरण कार्यक्रमाचीदेखील सुरूवात यावेळी पंतप्रधानांनी केली. यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी ‘सिंगल युज प्लास्टिक’च्या वापरावर बंदी घालण्याचेही आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हेदेखील उपस्थित होते.

भटके जनावरे रस्त्यावरील घाण खात असतात तसेच प्लास्टिक पिशव्यादेखील खातात त्यामुळे प्लास्टिक मुक्‍त भारताचा नारा देणे आजच्या काळाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच कार्यक्रमादरम्यान, प्लास्टिक आणि कचरा वेगळा करणाऱ्या मशीनचा वापरदेखील पंतप्रधानांनी केला आणि तिथे उपस्थित असणाऱ्या कामगारांशी त्यांनी यावेळी चर्चा केली आणि त्यांच्या कामात मदत देखील केली.

Leave A Reply

Your email address will not be published.